"हिरण्यदुर्ग" या कादंबरीचे विशेष हे सांगता येईल की,
कोणतेही विदेशी कथानक उसने न घेता "पूर्णपणे स्वतंत्र" अशी अत्भुतरम्य व वीर , भय, इत्यादी रसाने ओथंबलेली मराठी साहित्यातील खर्या अर्थाने पहीली कादंबरी म्हणता येईल.
याआधी गो.ना.दातार, नाथमाधव, ना.ह.आपटे इत्यादी प्रतिभावंतांनी रेनॉल्ड्स वा इतर पाश्चात्य साहित्यातील कथाबीजे वापरुन व त्याला मराठी वा भारतीय बाज चढवून अत्भुतरम्य कादंबर्यांची निर्मिती सुरु केली होती.
सुरुवातीला मनोरंजनासाठी या विदेशी कादंबर्यांची भारतीय वातावरणात रुपांतरे झाली हा साहित्यप्रकार मराठी वाचकांना जास्त रुचलाही. पण दुर्दैवाने अशा कादंबर्यांची रचना करणार्या प्रतिभावंतांची कमतरताच मराठी साहित्याला जाणवली. नाथमाधवांनी वीरधवल ही एक कादंबरी लिहून हा प्रयत्न थांबवला. अत्भुतरम्य कादंबर्यांचे जनक रुढार्थाने दातार ठरतात. दातारांनंतर कित्येक दशकांचा दुष्काळ पुढी शशी भागवतांनी मर्मभेद द्वारे संपवला. पण त्यातले ऐयार हे देवकीनंदन खत्रींच्या चंद्रकांता कादंबरीत येऊन दोन दशके लोटली होती. भागवतांनंतर अनेकांनी प्रयत्न केले खरे पण म्हणावे तसे कोणाला यश लाभले नाही.
अत्भुतरम्य कादंबरी हा सुंदर साहित्य प्रकार मराठीत खर्या अर्थाने स्वतंत्रपणे देण्याचे श्रेय संजय सोनवणी सरांच्या "हिरण्यदुर्ग" या कादंबरीला द्यावे लागेल. हिरण्यदुर्ग या कादंबरीमुळे भविष्यात अनेक लेखकांना स्वतंत्रपणे अत्भुतरम्य कादंबरी मराठी लिहिण्यासाठी प्रेरणा मिळेल यात शंकाच नाही.
"हिरण्यदुर्ग" या अत्भुतरम्य कादंबरीची नोंद मराठी साहित्यात मैलाचा दगड म्हणून कायमच भविष्यात नोंद घेतली जाईल.
'हिरण्यदुर्ग' या अत्भुतरम्य कादंबरीच्या यशासाठी खूप खूप शुभेच्छा !!!
जय सिंहभद्र !
- इति ब्रह्मसमंध
No comments:
Post a Comment