Wednesday, January 20, 2016

दिवाळी अंक - २०१५ : थोडी आशा आणि जास्त निराशा


मित्रांनो,

बर्‍याच उशीरा पोस्ट टाकत आहे याबद्दल क्षमस्व. खरे तर पोस्ट लिहावे असे  २०१५ च्या दिवाळी अंकांबद्दल वाटले नाही. एकूणच अंकांची संख्या भारंभार आणि चांगले अगदी मोजके. गवताच्या गंजीत सुई शोधावी तसे दिवाळी अंकांचे झाले आहे. काही मोजके दिवाळी अंक सोडले तर यावेळी अनेक नावाजलेल्या अंकांच्या वाचनाने निराशाच हाती लागली.

दिवाळी अंकांच्या बाबतीत जाणवलेली प्रमुख गोष्ट म्हणजे अवाजवी किंमती

उदाहरणार्थ : नवल व हंस सारख्या अवघ्या २५६ / २४८ पानी दिवाळी अंकाने किंमत ३०० रुपये ठेवावी हे समजण्यापलिकडे आहे. दिवाळी अंक आणि पुस्तक यात खूप मोठा फरक आहे हे प्रकाशकांनी लक्षात घेतले पाहिजे.
उदाहरणार्थ : साहित्य चपराक चा दिवाळी अंक २५० रुपयांचा आहे पण तो ४५० पानी देखील आहे आणि अतिशय वाचनीय म्हणजे दर्जेदारही आहे. तीच गोष्ट साहित्य लोभस ची देखील आहे. अवघ्या १२५ रुपयांत अंक आणि त्यातील साहित्य देखील उत्तम व वाचनीय आहे.  अशा अंकांसाठी लोक पैसे मोजू शकतील. पण नवल, मौज, आवाज, जत्रा  थोड्याफार प्रमाणात धनंजय, किस्त्रिम सारखे अंकही यावेळी किंमत व दर्जा यात तफावत दाखवतात. साहित्य चपराक, मिडिया वॉच, साहित्य लोभस, संयम, चंद्रकांत, लोकमत असे काही दिवाळी अंक किंमत व गुणवत्ता यांचा समतोल साधताना दिसतात
 
असो तरीही काही उल्लेखनीय अंक आहेत त्यांची माहिती देतो.
उत्तम व संग्राह्य अंकः

१. साहित्य चपराक२. साहित्य लोभस

३. केसरी ( दरवेळेस दुर्लक्षित असलेला पण यंदा चांगले लेख दिल्यामुळे वाचनीय झालेला दिवाळी अंक)


४. प्रभात


५. संयम


वाचनीय अंकः
१. महाराष्ट्र टाईम्स


२. महाराष्ट्राची जत्रा


३. अधिष्ठान


४. मेनका

५. अक्षर आयन


६. चंद्रकांत


७. पोलिस टाईम्स (अतिरंजितता टाळून केवळ पोलिस तपासावर भर देऊन प्रत्यक्ष गुन्हे व त्यांचे मानशशास्त्र यांचा चांगला वेध घेतलेला या अंकात बघायला मिळतो)


८. दुर्गांच्या देशातून (केवळ दुर्ग या विषयावर वाहिलेला हा एकमेव दिवाळी अंक असावा)


९. हसवंती नवलकथा


१०. मिडिया वॉचदिवाळी अंक घ्यायचे विसरले पण वाचायचे आहेत असे कोणाला वाटत असेल तर हेच अंक बुकगंगा.कॉम वरुन किंवा ग्रंथद्वार.कॉम वरुन ई-दिवाळी अंक विकत घेता येतील.