Tuesday, May 15, 2012

"मर्मभेद" या शशी भागवत यांच्या कादंबरी बद्दल

वीरधवल ही एकच अत्भुतरम्य कादंबरी नाथमाधवांनी लिहिलेली होती.
गो.ना.दातार यांनी इंद्रभुवनगुहा, शालिवाहन=शक, विलासमंदीर, कालिकामूर्ति, अधःपात, रहस्यभेद अशा एकापेक्षा एक सरस अत्भुतरम्य कादंबर्‍यांची (रेनॉल्ड्सच्या कादंबर्‍यांवरुन घेतल्या असल्या तरीही) निर्मिती केली होती. मला वाटते मायावति या नावाची रायडर हॅग्गार्ड याच्या "शी' या इंग्रजी कादंबरीवर बेतलेली एक कादंबरी होती.

कित्येक वर्षे अत्भुतरम्य कादंबर्‍यांचा दुष्काळ पडला होता.
मला वाटते ज्ञानदा पब्लिकेशन्स ने १९६६ का १९७६ साली (नक्की आठवत नाही) शशी भागवत यांची "मर्मभेद" प्रकाशित केली आणि अत्भुतरम्य कादंबर्‍या आवडणार्‍या वाचकवर्गात एकच गदारोळ उडाला. आपल्या ऐयारी विद्येने आणि अत्भुत पराक्रमाने ऐयारशिरोमणी वीरभद्र या पात्राने अत्भुतरम्य कादंबर्‍या आवडणार्‍या वाचकांच्या मनावर मोहिनी घातली. मला दुर्दैवाने फारसे कथानक आठवत नाहिये, पण मला वाटते देवकीनंदन खत्री यांच्या चंद्रकांता या कादंबरीतही ऐय्यार विद्येचे चमत्कार आले होते. मर्मभेदातील काही पात्रे आपण पाहूयात ज्यांच्यामुळे मर्मभेद हे देवकीनंदन खत्री यांच्या कादंबरीचे मराठीकरण वाटावे इतपत साम्य असलेल्या व्यक्तीरेखा "मर्मभेद" मध्ये आहेत.
असे असो वा नसो, पण "मर्मभेद" अतिशय अत्भुतरम्य कादंबरी आहे यात शंकाच नाही.

मर्मभेदातली पात्रे :
कृष्णांत : हा या कादंबरीतील खलनायक ( चंद्रकांता मधील क्रूरसिंग?)
शार्दूलसिंह
तेजस्विनी (ही की प्रलयिनी? चंद्रकांतातील चंद्रकांता?)
प्रलयिनी
सरदार रुंडकेतू
सुलसादेवी
ऐयारशिरोमणी वीरभद्र (चंद्रकांतातील तेजसिंह?)
रमलशास्त्री विश्वंभर (चंद्रकांतातील पंडित जगन्नाथ?)
युवराज कुणाल (चंद्रकांतातील विरेन्द्रसिंह )
ऐयार कंदुक आणि मंडूक (चंद्रकांतातील क्रूरसिंगचे २ ऐय्यार सेवक आफतखां व जालिमखां)
शार्दूलसिंहाची पत्नी गजगौरी
तिचे मामा सरदार सत्यपालसिंह
ऐयार भेदक (चंद्रकांतातील बद्रीनाथ)
कालिका / कलंकी
मायावती
कापालिक कंकाल
सम्राट

प्रथमावृत्तीनंतर १९७९, १९९२, १९९९? / २००४? अशा मर्मभेदच्या आवृत्त्या निघाल्या. हे पुस्तक शोधून शोधून मी आणि माझ्यासारखे कित्येक मर्मभेदप्रेमी दमलो, पण "मर्मभेद" पुन्हा छापायचे प्रकाशक काही मनावर घेत नाहियेत, तेव्हा म्हटले या धाग्याच्या निमित्ताने जाणकार लोकांकडून मर्मभेदचे कथानक माहिती करुन घ्यावे व पुन्हा एकदा मर्मभेदामधील अत्भुतरम्यतेचा अनुभव आपणही घ्यावा व सर्वांनाही द्यावा. हास्य

तेव्हा मित्रांनो आणि मैत्रिणींनो, मर्मभेदबद्दल तुम्हाला जे काही माहिती आहे त्याअनुषंगाने चर्चा करा व मर्मभेद या अत्भुतरम्य कादंबरीतील थरार पुन्हा एकदा सर्वांनी अनुभवा ही विनंती


(चित्र जालावरुन घेतले आहे. त्याचे अधिकार संबंधित व्यक्ती वा संस्थांकडे सुरक्षित आहेत)

2 comments:

  1. I have read Marmabhed during my junior college days. it is still available in our Municipal library. The forward was written by none other than "Pu La" himself. Its very interesting to read though the plot is too predictable.

    ReplyDelete
  2. मल्हार मित्रवर्या.. खरे आहे. 'मर्मभेद'ने एक काळ खरेच गाजवला होता. त्यातील कृष्णान्ताची वर्णने आठवली की अजूनही अंगावर काटा येतो :)

    ReplyDelete