
Wednesday, May 16, 2012
साने गुरुजी समग्र साहित्य

Tuesday, May 15, 2012
जुने चांदोबा मराठीतून जसेच्या तसे वाचा ( तेही फुकट )
जुने चांदोबा मराठीतून जसेच्या तसे वाचा ( तेही फुकट )
जुने चांदोबा वाचा जुन्या काळात रमा
नवीन चालत असलेली लिंक : https://www.chandamama.in/marathi/
जुन्या लिंक्स चालत नाहीयेत. वाचकांनी वरील लिंक वापरावी. धन्यवाद.
http://www.chandamama.com/lang/MAR/index.htm
जुन्या चांदोबांची थेट लिंक : http://www.chandamama.com/archive/MAR/storyArchive.htm
धूमकेतू, कांशाचा किल्ला, तीन मांत्रिक, अग्निद्विप, भल्लूक मांत्रिक, इ... सर्व कथा आणि सर्व चांदोबा जसाच्या तसा वाचा
![]() |
From General |
![]() |
"मर्मभेद" या शशी भागवत यांच्या कादंबरी बद्दल
वीरधवल ही एकच अत्भुतरम्य कादंबरी नाथमाधवांनी लिहिलेली होती.
गो.ना.दातार यांनी इंद्रभुवनगुहा, शालिवाहन=शक, विलासमंदीर, कालिकामूर्ति, अधःपात, रहस्यभेद अशा एकापेक्षा एक सरस अत्भुतरम्य कादंबर्यांची (रेनॉल्ड्सच्या कादंबर्यांवरुन घेतल्या असल्या तरीही) निर्मिती केली होती. मला वाटते भिकाजी भिडे यांनी लिहिलेली मायावति या नावाची कादंबरी रायडर हॅग्गार्ड याच्या "शी' या इंग्रजी कादंबरीवर बेतलेली होती.
कित्येक वर्षे अत्भुतरम्य कादंबर्यांचा दुष्काळ पडला होता.
मला वाटते ज्ञानदा पब्लिकेशन्स ने १९६६ का १९७६ साली (नक्की आठवत नाही) शशी भागवत यांची "मर्मभेद" प्रकाशित केली आणि अत्भुतरम्य कादंबर्या आवडणार्या वाचकवर्गात एकच गदारोळ उडाला. आपल्या ऐयारी विद्येने आणि अत्भुत पराक्रमाने ऐयारशिरोमणी वीरभद्र या पात्राने अत्भुतरम्य कादंबर्या आवडणार्या वाचकांच्या मनावर मोहिनी घातली. देवकीनंदन खत्री यांच्या चंद्रकांता या कादंबरीतही ऐय्यार विद्येचे चमत्कार आले होते. मर्मभेदातील काही पात्रे आपण पाहूयात ज्यांच्यामुळे मर्मभेद हे देवकीनंदन खत्री यांच्या कादंबरीचे मराठीकरण वाटावे इतपत साम्य असलेल्या व्यक्तीरेखा "मर्मभेद" मध्ये आहेत.
असे असो वा नसो, पण "मर्मभेद" अतिशय अत्भुतरम्य कादंबरी आहे यात शंकाच नाही.
मर्मभेदातली पात्रे :
कृष्णांत : हा या कादंबरीतील खलनायक ( चंद्रकांता मधील क्रूरसिंग?)
शार्दूलसिंह
तेजस्विनी (ही की प्रलयिनी? चंद्रकांतातील चंद्रकांता?)
प्रलयिनी
सरदार रुंडकेतू
सुलसादेवी
ऐयारशिरोमणी वीरभद्र (चंद्रकांतातील तेजसिंह?)
रमलशास्त्री विश्वंभर (चंद्रकांतातील पंडित जगन्नाथ?)
युवराज कुणाल (चंद्रकांतातील विरेन्द्रसिंह )
ऐयार कंदुक आणि मंडूक (चंद्रकांतातील क्रूरसिंगचे २ ऐय्यार सेवक आफतखां व जालिमखां)
शार्दूलसिंहाची पत्नी गजगौरी
तिचे मामा सरदार सत्यपालसिंह
ऐयार भेदक (चंद्रकांतातील बद्रीनाथ)
कालिका / कलंकी
मायावती
कापालिक कंकाल
सम्राट
प्रथमावृत्तीनंतर १९७९, १९९२, १९९९? / २००४? अशा मर्मभेदच्या आवृत्त्या निघाल्या. हे पुस्तक शोधून शोधून मी आणि माझ्यासारखे कित्येक मर्मभेदप्रेमी दमलो, पण "मर्मभेद" पुन्हा छापायचे प्रकाशक काही मनावर घेत नाहियेत, तेव्हा म्हटले या धाग्याच्या निमित्ताने जाणकार लोकांकडून मर्मभेदचे कथानक माहिती करुन घ्यावे व पुन्हा एकदा मर्मभेदामधील अत्भुतरम्यतेचा अनुभव आपणही घ्यावा व सर्वांनाही द्यावा.
तेव्हा मित्रांनो आणि मैत्रिणींनो, मर्मभेदबद्दल तुम्हाला जे काही माहिती आहे त्याअनुषंगाने चर्चा करा व मर्मभेद या अत्भुतरम्य कादंबरीतील थरार पुन्हा एकदा सर्वांनी अनुभवा ही विनंती
(चित्र जालावरुन घेतले आहे. त्याचे अधिकार संबंधित व्यक्ती वा संस्थांकडे सुरक्षित आहेत)
अद्भुतरम्य कादंबऱ्यांचा मोठा दुष्काळ शशी भागवत यांच्या ३ कादंबर्यांनंतर होता.
पण अलीकडेच २ अद्भुतरम्य कादंबऱ्या मी पाहिल्या आहेत आणि त्यातली १ वाचली पण आहे. एकूणच हा साहित्य प्रकार पुन्हा मराठी साहित्यात लवकरच पुन्हा एकदा बाळसे धरेल असे दिसते आहे.
१. हिरण्यदुर्ग - सुप्रसिद्ध लेखक संजय सोनवणी यांनी लिहिलेली ही अद्भुतरम्य कादंबरी मी वाचली आहे. अतिशय सुंदर आणि पूर्णपणे स्वतंत्र अशी ही कादंबरी आहे. महाराष्ट्राचे वैभव असलेल्या सातवाहन राजांच्या पार्श्वभूमीवरची ही सुंदर कादंबरी आहे. एक अतिशय थरार वाचकांना ही कादंबरी वाचताना अनुभवायला मिळेल हे खात्रीने सांगू शकतो.
महाराष्ट्र टाइम्स मध्ये या कादंबरीचा परिचय वाचता येईल : https://marathi.indiatimes.com/editorial/samwad/book-review/articleshow/46157310.cms
अद्भुतरम्य कादंबरी साहित्यप्रकार आवडणार्या वाचकांना या कादंबर्या ऑनलाईन ऑर्डर करता येतील. पुढे लिंक्स दिल्या आहेत.
ऍमेझॉन : https://www.amazon.in/Hiranyadurg-Marathi-Sanjay-Sonavani/dp/B07Z2R98LB/ किंवा https://www.amazon.in/Hiranyadurg-Sanjay-Sonwani/dp/B016YEZMCQ/
बुकगंगा : https://www.bookganga.com/R/3CZKG
२. शौर्यशृंग - अभिषेक साळुंखे (याचे वाचन अजून मी केले नाहीये. )
ऍमेझॉन : https://www.amazon.in/Shouryshrung-Abhishek-salunkhe/dp/9357376135
बुकगंगा : https://www.bookganga.com/R/8O1YO
"दलित कुसुम"

मित्रांनो,
कालच मी इंटरनेटवर अवघ्या ११० पानांची "दलित कुसुम" ही कादंबरी एका दमात वाचून संपवली
त्याकाळी अवघी १२ आणे किंमत असलेली 'दलित कुसुम' ही कादंबरी मूळ बंगालीत "श्री. बाबू नारायण दास मौलिक" यांनी लिहिलेली होती. तिचा "श्रीकार्तिकप्रसाद" यांनी केलेला हिंदी अनुवाद वापरुन "कै. रा.रा.अनंत केशव चितळे" आणि "नारायण रामचंद्र गोखले" यांनी तिला मराठीत आणली. १९०२ साली प्रसिद्ध झालेली ही कादंबरी नशिबाचे फेरे कसे फिरतात आणि मानवी इच्छा माणसाकडून काय काय करवून घेतात हे अतिशय प्रभावीपणे दाखवते. मुळात ही कादंबरी लिहिली गेली त्याकाळची मराठी मला खूप आवडते म्हणूनही असेल, पण मला ही छोटीशी कादंबरी आवडली. तुम्हाला वाचायची असेल तर पुढे दुवा दिलाच आहे
दलित कुसुम ही कादंबरी ऑनलाईन इथे क्लिक करुन वाचता येईल
फक्त हीच कादंबरी नव्हे तर प्रताधिकारमुक्त कित्येक जुनी मराठी पुस्तके ऑनलाईन इथे वाचता येतील.
Tuesday, May 8, 2012
"पानिपत असे घडले..." - जाहीर प्रकाशन समारंभ १७ मे २०१२

