Sunday, February 26, 2012

ही पुस्तके तुम्ही वाचलीत का?



















































































































































एवढ्यांतच मी काही छान छान पुस्तके घेतली आहेत, त्यांची यादी देतोय.
वाचनाची आवड असलेल्यांना या यादीचा कदाचित उपयोग होईल.

देवाज्ञा - नारायण धारप

नेनचिम - नारायण धारप - ही खरे तर विज्ञानकादंबरी शोभेल. पण वाचण्यासाठी खूप छान आहे.


मास्टर प्लॅन - सुहास शिरवळकर
स्टुपिड - सुहास शिरवळकर


नरेंद्र : रुक्मिणी स्वयंवर - आनंद साधले

माझी स्वप्ने - न्यायमूर्ति राम केशव रानडे ('प्रसाद' मासिकातून अतिशय लोकप्रिय झालेली ही लेखमाला पुस्तकरुपाने) या दुव्यावर या पुस्तकाची काही पाने वाचायला मिळतील

कैफी आणि मी - शौकत कैफी (अशोक काका पाटील यांनी लिहिलेल्या या परिक्षणामुळे घेतले )

छत्रपती शिवाजी महाराज जीवनरहस्य - नरहर कुरुंदकर ( छोटीशी पुस्तिका पण आवाका प्रचंड)

थेंब अत्तराचे - नरहर कुरुंदकर (कुरुंदकरांनी लिहिलेल्या चौदा कवितासंग्रहांच्या प्रस्तावना, दोन काव्यसंग्रहांची परीक्षणे व एका कवितेसंबंधीचे विवेचन )

दुदैवी रंगू - भारताचार्य म्हणून ज्यांना गौरविले जाते त्या चिं. वि. वैद्य यांची पानिपत युद्धाचा उपकथानकाच्या साहाय्याने वेध घेणारी कादंबरी

टीकास्वयंवर - भालचंद्र नेमाडे (साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त टीका व समीक्षा ग्रंथ)
राडा - भाऊ पाध्ये (प्रस्तावना भालचंद्र नेमाडे) मुंबईच्या पार्श्वभूमिवरची कादंबरी

हिंदू - जगण्याची समृद्ध अडगळ - भालचंद्र नेमाडे

सौंदर्यानुभव - प्रभाकर पाध्ये (साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त 'साहित्य आणि समीक्षा' ग्रंथ)

म्हैसूरचा वाघ - ह.ना. आपटे (टिपू सुलतानवरची कादंबरी)

उ:शाप - वि.स.खांडेकर

चोमा महार - शिवराम कारंथ - मराठी अनुवाद - श्यामलता काकडे (वल्ली चे रेकमेंडेशन )

शिवभूषण - निनाद बेडेकर

हेमाद्री उर्फ हेमाडपंत यांचे चरित्र - केशव अप्पा पाध्ये

समुद्र - मिलिंद बोकील ( माझ्याकडचे हरवले म्हणून परत घेतले)

तुकाराम - भालचंद्र नेमाडे (या पुस्तकाच्या निर्मितीची अफलातून कथा इथे वाचायला मिळेल) - भालचंद्र नेमाड्यांची आता जवळपास सर्व पुस्तके माझ्या संग्रहात आली :)

आणि माझी यादी ज्या माझ्या दोन मित्रांच्या उल्लेखाशिवाय पूर्ण होऊ शकत नाही त्या दोन मित्रांनी मला भेट म्हणून दिलेली दोन पुस्तके

माहिमची खाडी - मधु मंगेश कर्णिक - हे पुस्तक मला माझा मित्र सागर उर्फ वल्ली याने भेट म्हणून दिले.

एक असतो बिल्डर - डॉ. सुधीर निरगुडकर हे पुस्तक मला माझ्या मनिष या मित्राने भेट म्हणून दिले.

मित्रांनो तुम्हीही ही पुस्तके वाचा आणि कशी वाटली ते नक्की सांगा...

No comments:

Post a Comment