Thursday, September 17, 2020

दुर्मिळ पुस्तके जी पुन्हा उपलब्ध व्हावीत असे वाटते

१. विक्रम आणि वेताळ 
वरदा प्रकाशन चे ५ खंड 
२. सिंहासन बत्तीशी - स. आ. जोगळेकर 
३. पिशाच्च साधन - ना. ह. आपटे 
४. ऋग्वेद - सिद्धेश्वर शास्त्री चित्राव 
५. भा. रा. भागवत यांनी ज्युल वर्न यांची मराठीतून अनुवादित केलेला पूर्ण संच (मूळ हवाय. नवीन उपलब्ध असलेला संपादित करून निकृष्ट केलेला संच नकोय) 
६. वरदा प्रकाशन ची अनेक जुनी उत्तम पुस्तके आता उपलब्ध नाहीयेत. त्यांनी छान काम केले होते. ती सर्व पुन्हा उपलब्ध झाली तर अनेक लोक घेतील.
७. सोनेरी पान मालिका - आनंद साधले (कालिदास , भास इत्यादी संस्कृतच्या पंडितांनी रचलेल्या नाटकांची कादंबरी रूपांतर मूळ रस माधुरी तशीच टिकवून लिहिलेली ही मालिका खूप वाचनीय होती. )
८. चित्र प्रिया - मूळ तमिळ  लेखक अखिलन - मराठी अनुवाद उत्तम जमलेला आहे. अनुवादक आठवत नाही. 
९. आर्यपुत्र कुणाल - जैन आनंद प्रकाश 
१०. दलित कुसुम - मूळ बंगाली कादंबरी आहे. छोटीशीच पण केवळ अप्रतिम आहे 

ही सर्व पुस्तके पुन्हा उपलब्ध झालीत तर खूप वाचक नक्की घेतील.

1 comment:

  1. तुमची माहिती खुप छंन आहे.
    आमच्या ब्लॉग ला पन भेट नक्की द्या.
    JIo Marathi

    ReplyDelete