वाचकहो,
यंदाच्या वर्षी दिवाळी अंक नेहमीप्रमाणेच जोमाने आणि अतिशय मुबलक प्रमाणात येत आहेत.
वाचकांना दिवाळी अंकांच्या या भाऊगर्दीत नेमके कोणते दिवाळी अंक वाचायचे हा प्रश्न नेहमीच पडतो. मी स्वतः बाजारात उपलब्ध असलेले जवळपास सर्व दिवाळी अंक पाहून मगच कोणते अंक घ्यायचे वा वाचायचे हे ठरवतो. सहसा माझा अंदाज आजपर्यंत चुकत नाही असा माझा अनुभव आहे. माझा हा अनुभव याही वर्षी दिवाळी अंकांच्या निवडीसाठी तुम्हा वाचकांसोबत वाटून घेणार आहे.
अनेक नवनवीन दिवाळी अंक अतिशय दर्जेदार साहित्य घेऊन येत आहेत. तर जुने दिवाळी अंक जुन्याच पण प्रतिथयश लेखकांना घेऊन दिवाळी अंक सादर करत आहेत. एकूणच मेजवानी वाट बघते आहे दिवाळीत.
माझी दिवाळी अंकांची निवड मी आतापासूनच सुरु केली आहेत. तरीही सर्व दिवाळी अंक बाजारात दिवाळी सुरु झाल्यावर लक्ष्मीपूजनाच्या दिवसापर्यंत येऊन जातात. काही अपवादाने दिवाळीच्या शेवटी शेवटी बाजारात येतात. असो. माझी दिवाळी अंकांची ही सहल तुम्हा सर्वांना लवकरच सांगायला सुरुवात करेन.
धन्यवाद,
सागर
वाट बघत आहे
ReplyDeleteआणि ऑनलाईन अंक पण यादीत टाका ...
जरुर नितिन...
Deleteऑनलाईन उपलब्ध असलेले दिवाळी अंक देखील लवकरच देईन
कृपया साहित्याला वाहिलेला दिवाळी अंक माहित असल्यास कळवावे हि विनंती.
ReplyDeleteअनिकेत,
Deleteसाहित्याला वाहिलेले अनेक अंक आहेत. जसे 'मेहता ग्रंथ जगत् ' , 'रसिक' , 'ललित' , इत्यादी. या वर्षीचे अंक बघून सांगेन
धन्यावद सर, आपल्या उत्तराची वाट बघतोय......
Deleteचांगल्या अंकांची यादी द्या संग्रही ठेवता येतील असे
ReplyDelete