Saturday, December 24, 2011

या आठवड्यात आठवलेली काही सुंदर पुस्तके :

सोमवार, १९ डिसेंबर २०११

(महाभारत विशेष) आजच्या दिवसाचे सुंदर पुस्तक: * "ययाति" *, लेखकः विष्णु सखाराम उर्फ वि.स.खांडेकर , प्रकाशक : मेहता पब्लिशिंग हाऊस (ययाति, देवयानी आणि शर्मिष्ठा यांची महाभारतातील ही कथा प्रत्यक्षात अनुभवतो आहोत असे ही साहित्य अकादमी पुरस्कारप्राप्त कादंबरी वाचताना जाणवते. भान हरपवणारी कादंबरी )



मंगळवार, २० डिसेंबर २०११

(महाभारत विशेष) आजच्या दिवसाचे सुंदर पुस्तक: * "मृत्युंजय" *, लेखकः शिवाजी सावंत , प्रकाशक : कॉन्टिनेन्टल प्रकाशन ( महाभारतातील कर्णाची ही कादंबरी वाचताना ही कथा नसून एक व्यथाच आपण अनुभवतो आहोत असे वाटते. भारतीय ज्ञानपीठच्या मूर्तिदेवी पुरस्काराने सन्मानित ही कादंबरी कित्येक भाषांतून अनुवादीत झाली आहे. महारथी कर्णाची बाजू मांडणारी, एक नितांतसुंदर साहित्य कलाकृती.)


From


बुधवार, २१ डिसेंबर २०११

(महाभारत विशेष) आजच्या दिवसाचे सुंदर पुस्तक: * "ययातिकन्या माधवी" *, लेखिका : विजया जहागीरदार , प्रकाशक : ऋचा प्रकाशन ( महाभारतातील ययातिने दक्षिणा देण्यास असमर्थ असल्यामुळे स्वतःची कन्या हेतुपूर्तिसाठी म्हणून एका ऋषिला दिली, व ती दक्षिणा वसूल होईपर्यंत ही ययातिकन्या माधवी त्यात भरडत राहिली. एका राजाकडून दुसर्‍या राजाकडे. एका मुलाला जन्म देऊन पुन्हा पुन्हा ही माधवी तयार होत होती. नक्की का? व कशासाठी? हे सर्व जाणून घेण्यासाठी ही हादरवून सोडणारी कादंबरी अवश्य वाचा.)

From


गुरुवार, २२ डिसेंबर २०११

(महाभारत विशेष) आजच्या दिवसाचे सुंदर पुस्तक: * "नीलांगिनी" *, लेखिका : स्मिता पोतनीस, प्रकाशक : मेहता पब्लिशिंग हाऊस (द्रौपदीच्या नजरेतून महाभारताकडे पाहून महाभारताला एक वेगळा दृष्टीकोन देणारी कादंबरी)

From


शुक्रवार, २३ डिसेंबर २०११

(‎(महाभारत विशेष) आजच्या दिवसाचे सुंदर पुस्तक: * "युगंधर" *, लेखक: शिवाजी सावंत, प्रकाशक : कॉन्टिनेन्टल प्रकाशन (श्रीकॄष्णाचे युगंधर हे नामाभिमान कसे सार्थ होते हे सांगणारी ही सुंदर कादंबरी. )


No comments:

Post a Comment