.
नमस्कार वाचक रसिकहो, 

यंदाच्या साहित्य संमेलनाची अध्यक्षपदाची निवडणुक उमेदवारांमुळे रंगात आलेली आहे. 

मी व्यक्तीशः यंदाच्या चारही उमेदवारांचे लेखन वाचलेले आहे. 
त्या तुलनेत श्री. संजय सोनवणी हे यंदाच्या उमेदवारांपैकी सर्वात योग्य आणि लायक उमेदवार आहेत. असे माझे मत आहे.
संजय सोनवणींची ग्रंथसंपदा एवढी जास्त आणि दर्जेदार आहे की दुसर्‍या बाजूला असलेल्या उमेदवारांची सर्व साहित्य सामग्री सोनवणींच्या निम्म्यानेदेखील भरत नाही.
साहित्य संमेलनाचे अध्यक्ष संजय सोनवणी होतील की नाही हे माहित नाही. पण वाचकांच्या पसंतीचे अध्यक्ष ते नक्कीच ठरु शकतील असा मला विश्वास वाटतो.
संजय सोनवणी यांनी लिहिलेल्या कित्येक थरार कादंबर्‍या २० पेक्षा जास्त वर्षे गेली तरी वाचनालयात आजही लोकप्रिय आहेत. एवढेच नव्हे तर ऐतिहासिक,  पौराणिक, वैज्ञानिक, कविता, नाटके, समीक्षा, संपादन, प्रकाशक, तत्त्वज्ञान, वैदिक कालीन संशोधन, मराठी भाषा अभिजात आहे की नाही यावर केलेले संशोधन, अशा अनेक विषयांवर सर्वांगीण व सर्व व्यापी लेखन केलेले आहे.

मी श्री. संजय सोनवणी यांना "साप्ताहिक कलमनामा" ने आयोजित केलेल्या वाचकांच्या कौलात मत दिले आहे. तुम्ही ज्यांचे साहित्य वाचले आहे व आवडले आहे अशा तुमच्यामते योग्य उमेदवाराला या संकेतस्थळावर जाऊन मतदान करावे ही विनंती. 

टीपः एक आयपी  अ‍ॅड्रेसवरुन एकच मत नोंदवता येईल.

धन्यवाद
- सागर

--------


वाचकांचा अध्यक्ष: भूमिका


vote
अखिल भारतीय साहित्य संमेलनाचा अध्यक्ष निवडण्याच्या प्रक्रियेत ज्यांच्या जीवावर साहित्य सृष्टी उभी असते त्या अगणित वाचकांच्या अपेक्षांना कसलेही स्थान नसते. वाचकच काय परंतू असंख्य लेखक, कवि, ललितलेखक, संपादक, पत्रकार विचारवंत आदिंनाही या प्रक्रियेत स्थान नसते ही दुर्दैवाची बाब आहे व त्याबाबत अनेकदा रोषही व्यक्त होत असतो. असे असले तरी अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाने याबाबत आजतागायत कसलीही हालचाल केलेली नाही. केवळ १०६९ मतदार यंदाचा साहित्य संमेलनाचा अध्यक्ष ठरवणार आहेत. कलमनामाला हे पुरेसे वाटत नाही. मतदान प्रक्रियेतील दोषांमुळे योग्य उमेदवार अध्यक्ष होतोच असेही नाही हा आजवरच्या बहुतेक साहित्य संमेलनांचा अनुभव आहे. ज्यांच्या जीवावर साहित्यसृष्टी उभी आहे त्यांनाही आपले मत नोंदवता यायला हवे यासाठी हे “वाचकांचा अध्यक्ष” निवडण्यासाठीचे मतदान आहे. यंदा खालील साहित्यिक/कवि अध्यक्षपदाच्या निवडणुकीत उभे आहेत. सामाजिक साहित्य जाणीवांना कोण अधिक प्रतिबिंबित करतो, कोणता साहित्यिक मराठी साहित्य संस्कृती व विचारसंस्कृतीला भविष्यात दिशा देऊ शकेल असे कार्य करू शकतो, त्या-त्या साहित्यिकाचे आजवरचे साहित्यिक योगदान काय यावर सारासार विचार करून आपल्या पसंतीच्या उमेदवाराच्या नांवासमोर क्लिक करून आपले मत नोंदवावे व अध्यक्ष निवडीच्या प्रक्रियेत बहुसंख्येने सामील व्हावे असे आम्ही आवाहन करीत आहोत.
ही वाचकांची मतदानप्रक्रिया १५ आक्टोबर २०१३ रोजी सायंकाळी ७ वाजेपर्यंत सुरू राहील. त्या क्षणापर्यंत जो उमेदवार सर्वाधिक मते मिळवेल तो उमेदवार “वाचकांचा अध्यक्ष” असेल. आम्ही कलमनामातर्फे वाचकांच्या निवडीच्या अध्यक्षाचा (यदाकदाचित अ. भा. मराठी साहित्य संमेलनाचा अध्यक्ष व वाचकांच्या पसंतीचा अध्यक्ष एकच ठरले तरी) अगणित वाचक-लेखकांच्या वतीने जाहीर सन्मान करू. यामुळे मराठी साहित्य क्षेत्रात वाचकांच्याही भावनांचा आदर ठेवला जाईल आणि मराठी साहित्य संस्कृतीचा पाया विस्तारवण्यासाठी मोलाची मदत होईल याचा कलमनामाला विश्वास आहे.

डॉ. प्रभा गणोरकर

ज्येष्ठ समिक्षिका, कथाकार व कवयित्री. दहाच्या आसपास कवितासंग्रह, कथासंग्रह व संपादने प्रसिद्ध. गंगाधर गाडगीळ: व्यक्ती आणि सृष्टी, किनारे मनाचे, विवर्त ही त्यांची गाजलेली पुस्तके. त्या पाचव्या समरसता साहित्य संमेलनाच्याही अध्यक्षा होत्या. शांता शेळके पुरस्कारासहित अनेक पुरस्कारांनी सन्मानित.

mf

प्रा. फ. मुं. शिंदे

(जन्म १९४८) १२ च्या आसपास कविता संग्रह व एक व्यक्तिचित्रण प्रसिद्ध. “आई” ही त्यांची सर्वाधिक गाजलेली कविता. शेकडो काव्यमैफिलींत रंगत भरणारे कवि म्हणून प्रसिद्ध आणि सुपरिचित. २००९ साली भरलेल्या मराठवाडा मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष. पेशाने ते मराठीचे प्राध्यापक आहेत. २०११ साली त्यांना मिळालेल्या कुसुमाग्रज साहित्य पुरस्कारासह अनेक पुरस्कारांनी ते सन्मानित आहेत. ते मराठी रंगभूमी परीनिरिक्षण मंडळाचेही विद्यमान अध्यक्ष आहेत.

ssश्री. संजय सोनवणी

(जन्म १९६४) यांचे आजवर ऐंशीपेक्षा अधिक ग्रंथ प्रसिद्ध झाले असून असून त्यात ऐतिहासिक, सामाजिक, थरार, विज्ञान, तत्वज्ञान व किशोर कादंब-यांचा व इतिहास, नीतिशास्त्र, विश्वनिर्मिती शास्त्र, समाजशास्त्र या विषयांवरील संशोधनात्मक ग्रंथांचाही समावेश आहे. त्याखेरीज त्यांचे तीन काव्यसंग्रह, ७ नाटके प्रसिद्ध तर आहेतच पण शेती, शिक्षण, अर्थकारण अशा सामाजिक व आंतरराष्ट्रीय प्रश्नांवरील शेकडो लेख किर्लोस्कर, किस्त्रीम, लोकमत, पुढारी, पूण्यनगरी, कलमनामा ते लोकप्रभासारख्या प्रतिष्टित नियतकालिके व वर्तमानपत्रांत प्रसिद्ध झाले आहेत. त्यांच्या अनेक कादंब-या, नाटके व कवितासंग्रह इंग्रजीतही प्रसिद्ध असून त्यांची दखल जागतिक पातळीवर घेतली गेली आहे. ते नियमीत ब्लोगलेखकही आहेत.

agश्री. अरुण गोडबोले

ज्येष्ठ चित्रपट निर्माते व लेखक. २० च्या आसपास पुस्तके प्रसिद्ध. प्रवासवर्णने, करसल्ल्यांबाबतची पुस्तके, अनुभवकथन, वृत्तपत्रीय लेखांचे संग्रह, काव्यसंग्रह व अध्यात्मविषयक पुस्तकांचा त्यात समावेश आहे. यशस्वी जीवनाची समर्थसूत्रे, श्रीदासबोध नित्यपाठ, अजिंक्यतारा ते आल्प्स, श्री मनाचे श्लोक:एक मागोवा अशी त्यांची काही पुस्तके आहेत.