Thursday, June 23, 2011

पुस्तकांवर प्रश्नमंजुषा



माझे प्रिय मित्र देवेन्द्र प्रभुणे यांनी पुस्तकविश्व.कॉम या संकेतस्थळावर अनेक प्रश्नमंजुषा घेतल्या आहेत. त्यातील मला आलेल्या प्रश्नांची उत्तरे वाचकांना माहिती व्हावीत यासाठी देत आहे.


धन्यवाद,
~ सागर 

१.मराठीतील पहिले पुस्तक कोठे छापल्या गेले?(जागेचे नाव)
उत्तर  : मातृभाषेतील पहिले पुस्तक दुसर्‍या प्रदेशात छापले जावे आणि तेही अमराठी, त्यातही ज्यांची गुलामगिरी पत्करावी लागली त्या ब्रिटिशांच्या पैकी एकाच्या - विल्यम कॅरे या गृहस्थामुळे, यात दुसरे दु:ख ते कोणते?
श्रीरामपूर (त्या काळचे एकसंध बंगाल) १८०५ साली छापले गेले.



२.पुढील प्रस्तावना कोणत्या पुस्तकातील आहेत?
अ.  शंभरातील नव्याणवास
      उत्तर : नन अदर दॅन कोसला - भालचंद्र नेमाडे
ब. "टु इन्ग्रिड बर्गमन " 
      उत्तर : कवी ग्रेस - काव्यसंग्रह - संध्याकाळच्या कविता 



३.पुरुष असुनही स्त्रीटोपणनावाने लेखन करणारे लेखक कोण?
उत्तर  :  चिं. त्र्यं. खानोलकरांनी आरती प्रभू हे स्त्री नाव काव्य लेखनासाठी वापरले

४.बाबुराव अर्नाळ्करांचे मूळ नाव काय?
उत्तर  : चंद्रकांत सखाराम चव्हाण

५.कोणत्या मराठी साहीत्यकाला "दो रास्ते" ह्या चित्रपटासाठी कथेचे filmfare पारितोषीक मिळाले होते?
उत्तर  : - चंद्रकांत काकोडकर

६."सुर्य"ह्या श्री.दा.पानवलकरांच्या कथेवर कोणता विख्यात हिंदी चित्रपट बनवलेला आहे?
उत्तर  : - अर्धसत्य.. जबरदस्त चित्रपट. श्रेय मात्र विजय तेंडूलकरांनी पटकथा लिहिल्यामुळे त्यांच्याकडे गेलं.

७.अठरा धान्यांचे कडबोळे हे कोणत्या विनोदी कथासंग्रहाचे मूळ नाव आहे?
उत्तर  : संकलित लेख - श्रीपाद कृष्ण कोल्हटकर

८.बहिणाबाई चौधरी ह्यांचया कविता जगासमोर आणणारे साहित्यिक कोण?
उत्तर  : - आचार्य अत्रे 

९.कोणत्या विख्यात कवीच्या विनोदी कथा संग्रह् रुपात प्रसिद्ध झाल्या आहेत?
उत्तर  : राम गणेश गडकरी यांनी गोविंदाग्रज या नावाने अदमासे दीडशेच्या आसपास कविता लिहिल्या आहेत.
मनोरंजन मासिकातून त्यांनी बाळकराम या नावाने जे विनोदी लेखन केले ते रिकामपणची कामगिरी या संग्रहातून प्रसिद्ध झाले आहे.

१०.रुपक कथा मराठीत आणणारे साहित्यिक कोण?
उत्तर  : वि.स. खांडेकर