पुस्तकाचे नाव : समथिंग
लेखक : सुहास शिरवळकर
मला समथिंग का आवडते त्याची अनेक कारणे आहेत.
१. इतर भयकथा मधून जे दिसते ते हिरवे डोळे, अक्राळ विक्राळ लोंबत्या मांसाचे चेहरे... असे कोणतेही उल्लेख समथिंग मध्ये नाहीत. असे असूनही एक भयाण वातावरण निर्मिती करणे हे सुशिंचे मोठे कसब मानतो मी.
२. दोन जुळ्या भावांची समानता व वैचारिक कनेक्टिव्हिटी या मानसिक गोष्टीचा मस्त वापर समथिंग मध्ये आहे.
३. दानिश या भावाचा गूढ मृत्यू होतो आणि दुसरा भाऊ त्याच्या लग्न झालेल्या बायकोला पहिल्यांदा भेटतो. आणि सुरू होतें एक थरकापवणारे एक जबरदस्त नाट्य.
४. रात्रीच्या वेळी भयकथा वाचून भय निर्माण करणाऱ्या अनेक कथा आहेत. पण समथिंग दिवसा वाचताना देखील अंगावर काटा येतो जो इतर भयकथा वाचताना येत नाही. आणि समथिंग तुम्ही रात्री वाचून बघाच. कशी हालत होते ते 😜😜
५. साहित्य मूल्याच्या दृष्टिकोनातून देखील समथिंग एक वेगळी कादंबरी ठरते.
६. काळी मांजर आणि गूढ पद्धतीने येणारी भावाची बायको लिझ एक थरकाप उडवते
७. गावातील एकामागोमाग एक विचित्र घटना वाचकांना भयभीत करतात.
एवढी बलस्थाने सांगितल्यावर कथेची ओळख मुद्दाम करून देत नाहीये. कारण एकदा कादंबरी सुरू झाली की पानोपानी निर्माण होणारी उत्कंठा तुम्हाला स्वस्थ बसू देणार नाही. आणि ती उत्कंठा शांत करण्यासाठी समथिंग ही कादंबरी तुम्ही पूर्ण वाचणारच 😁
काय मग वाचताय समथिंग रात्रीच्या वेळी ?? केव्हाही वाचा. अनुभव सुंदर येईल याची खात्री आहे.
धन्यवाद,
- #पुस्तकवेडा